MPSC Exams | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त मुख्य परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Exams) घेण्यात येणारी संयुक्त मुख्य परीक्षा- 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 मध्ये घेण्यात येणार होत्या पण आयोगाने ह्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. प्रशासकीय कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आयोगाने (MPSC Exams) स्पष्ट केले आहे.

 

आयोगाकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 24 डिसेंबर रोजी संयुक्त पेपर क्रमांक 1, 31 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक, 7 जानेवारी 2023 रोजी राज्यकर निरीक्षक, 14 जानेवारी 2023 रोजी सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी परीक्षा होणार होती. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोगाने परिपत्रकाद्वारे सोमवारी दिल्याने विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घेण्याचे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

 

आता संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या सहसचिवांनी सांगितले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना पुढील तारखांची प्रतीक्षा आहे.

 

Web Title :- MPSC Exams | joint main examination 2022 to be conducted by maharashtra public service commission has been postponed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले