MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षा 4, 5 आणि 6 डिसेंबरला मुंबई-पुण्यासह ‘या’ 6 जिल्हा केंद्रावर होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन MPSC | राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad), अमरावती (Amravati) व नागपूर (Nagpur) या जिल्हा केंद्रावर (district center) होणार आहेत. तसेच अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे, असे कळवण्यात आले आहे.

यासंदर्भात आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या
(state government) सेवेतील विविध संवर्ग/सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत
दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 (State Service Pre-Examination 2020) च्या दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या
निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020,
दिनांक 4,5 व 6 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर,
नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
त्यामध्ये 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून.
मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.

 

Web Title : MPSC | maharashtra public service commission the state service main examination will be held on december 4 5 and 6 at mumbai, pune, nashik, aurangabad, amravati and nagpur district center’s

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thackeray Government | सोमय्यांच्या आरोपानंतर आता ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

PMSBY | वर्षाला द्यावा लागेल फक्त आणि फक्त 12 रुपयांचा प्रीमियम, गरजेला मिळतील 2 लाख रुपये; जाणून घ्या

Saki Naka Rape Case | साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले – मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे