MPSC Main Exam | MPSC मुख्य परीक्षेला पात्र होण्यासाठी ‘CSAT’ च्या पेपर दोनमध्ये 33 टक्के गुण बंधनकारक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Main Exam | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत (Pre-Exam) समान्य अध्यायनाच्या पेपर (General Study Paper) क्रमांक दोनमध्ये (सीसॅट) 33 टक्के गुण मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीसॅटच्या या पेपरमध्ये 33 टक्के गुण मिळाले तरच मुख्य परीक्षेसाठी (MPSC Main Exam) पात्र समजले जाणार आहे.

 

सामान्य अध्ययन पेपर एकमधील गुण मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु, या गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेच्या (MPSC Main Exam) पात्र यादीत समाविष्ट होण्यासाठी पेपर क्रमांक दोन (CSAT) मध्ये किमान 33 टक्के गुणांची अट बंधनकारक करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

 

लोकसेवा आयोगाच्या या पूढील (2022) पूर्व परीक्षेपासून हा नियम बंधनकारक करण्यात येणार आहे.
लोकसेवा आयोगाच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात.
या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येकवर्षी वाढत आहे.

 

Web Title :- MPSC Main Exam | mpsc in order to be eligible for the main examination 33 marks are mandatory in csat paper two mpsc latest news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा