MPSC | निवड झालेले अधिकारी उतरले रस्त्यावर, पुण्यात चक्काजाम आंदोलन

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याने निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन केले. राज्य सरकारचा वेळकाढूपणा आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकून पडलेल्या नियुक्त्या यामुळे एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे मनोबल खचू लागले आहे. निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याच्या विरोधात पुण्यातील (Pune) अहिल्या अभ्यासिकेसमोर चक्काजाम आंदोलन केले. MPSC | officers selected after mpsc examination but no appointments are protesting in pune

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नियुक्ती बाबत सरकारचा वेळकाढूपणा

राज्य सेवा आयोगाचा निकाल लागल्यानंतर 413 उमेदवारांची निवड झाली आहे.
परंतु निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षे उलटून गेले तरी अद्याप नियुक्ती (Appointment) मिळालेली नाही. हे सर्व गट-अ पदाचे उमेदवार आहेत.
सरकार या विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यासाठी वेळकाढूपणा करत आहे.
त्यामुळे निवड झालेले अधिकारी सरकारच्या धोरणाला वैतागून रस्त्यावर उतले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

19 जून 2020 रोजी परीक्षेचा निकाल लागला आहे.
परंतु सरकाच्या धोरणाचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे.
दोन महिन्यामध्ये नियक्त्या होणे अपेक्षित होते.
परंतु एक वर्ष झाले तरी अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत.
सरकारने नियुक्त्या केल्या नसल्याने 9 सप्टेंबर 2020 च्या मराठा आरक्षणाबाबतच्या (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कचाट्यात या नियुक्त्या अडकून पडल्या आहेत.
5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना इतर नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला होता.
न्यायालयाच्या या निर्णयाला दोन महिने होऊ गेले तरी राज्य सरकारने (State Government) यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Web Title : MPSC | officers selected after mpsc examination but no appointments are protesting in pune

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Black Pepper | काळ्या मिरीचे छोटे-छोटे दाने खुपच फायद्याचे, वजन देखील कमी करतात, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Pune corona | पुणे जिल्ह्यात 107 गावात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, परिस्थिती अद्यापही बिकटच

Chitra Wagh | ‘आम्हलाही आरे ला कारे करण्याची भाषा येते’, चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिली ‘वॉर्निंग’ (व्हिडीओ)