×
Homeताज्या बातम्याMPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक...

MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी ‘या’ कालावधीत होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC PSI Recruitment | पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी (Physical Test) व प्रमाणपत्र पडताळणी (Certificate Verification) कार्यक्रम 7 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल (State Reserve Police Force), गट क्रमांक 1 व गट क्रमांक 2 रामटेकडी, हडपसर, पुणे (Hadapsar, Pune) येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणीची तारीख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC PSI Recruitment) जाहीर केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक (MPSC PSI Recruitment) मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-2021 च्या
लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 1 व गट क्रमांक 2 रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोगाने एका परिपत्राकाद्वारे शुक्रवारी (दि.18) जाहीर केले आहे.

प्रस्तुत शारीरिक चाचणीवेळी उमेदवारांची उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेण्याचे आयोगाने निश्चित केल्याचे
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title :-  MPSC PSI Recruitment | physical test and certificate verification of candidates who have passed the sub inspector written exam during

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार

Pune Crime | कोरेगाव पार्क येथील ‘कोरा कॉकटेल बार अँड किचन हॉटेल’वर गुन्हे शाखेची कारवाई

BJP MLA Ameet Satam | ‘मुंबईचा कोपरांकोपरा विकून तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला’ – आ. अमित साटम

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News