MPSC Recruitment-2022 | अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! MPSC मार्फत ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा, असा करा अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Recruitment-2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक संचालक आणि उप संचालक या पदांसाठी भरती (MPSC Recruitment-2022) होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Online Apply) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 असणार आहे.

 

या पदांसाठी भरती आणि पद संख्या

– सहाय्यक संचालक (Assistant Director)

– उप संचालक (Deputy Director)

– एकूण जागा – 54

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव

सहाय्यक संचालक (Assistant Director) –
उमेदवारांकडे मेकॅनिकल (Mechanical) किंवा इलेक्ट्रिकल (Electrical) किंवा इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) किंवा केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering) किंवा केमिकल टेक्नॉलॉजीची पदवी (Degree in Chemical Technology) असणे आवश्यक आहे. अथवा ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education) किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (University Grants Commission) द्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही समकक्ष पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (MPSC Recruitment-2022)

 

उप संचालक (Deputy Director)
उमेदवारांकडे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजीची पदवी असणे आवश्यक आहे. अथवा ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) द्वारे मान्यताप्राप्त इतर कोणत्याही समकक्ष पदवी आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क
– खुल्या प्रवर्गासाठी – 719 रुपये

– मागासवर्गासाठी – 449 रुपये

 

कागदपत्रे
– Resume (बायोडेटा)

– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र (Academic Certificate)

– शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)

– जातीचा दाखला Caste Certificate (मागसवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र ID Card (आधार कार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो

 

नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1Roz0vUjTg83-Sk97iaHbdvqQ_UABPIAU/view

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

 

Web Title :- MPSC Recruitment-2022 | mega job alert mpsc recruitment 2022 maharashtra public service commission

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Department Alert | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केले अलर्ट, यांच्यापासून रहा सतर्क अन्यथा पैशांचे सुद्धा होऊ शकते नुकसान

 

Pune NCP | भाजपला आर्थिक विषयात रस, निवडणूक निधी गोळा करण्याचा भाजपचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

 

Pune Nashik Semi High Speed Railway | महारेलने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातील स्थानकांसाठी इच्छुक कंपन्यांकडून मागवले EOI