MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी

पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC लवकरच मोठी भरती (MPSC Recruitment) जाहीर करणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा या पदांसाठी हि भरती (MPSC Recruitment) प्रक्रिया पार पडणार आहे. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मार्च 2023 असणार आहे.

कोणत्या पदांसाठी होणार आहे भरती? किती जागा असणार आहेत?
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा या पदांसाठी हि भरती होणार आहे. यामध्ये एकूण 673 जागांसाठी हि भरती (MPSC Recruitment) असणार आहेत.

पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालेले असावे. तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. याचबरोबर उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवर जा.

Web Title :- MPSC Recruitment | mpsc civil services recruitment 2023 openings for over 670 posts know how to apply here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur Crime News | माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

HSC Paper Leak Case | बारावी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

NCP MP Supriya Sule | आधी खाल्ल मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन, शिवसेना नेत्याच्या आरोपावर सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण