MPSC Rules Change | पोलीस उपनिरीक्षक पदाच्या गुणवत्ता यादीस मॅट मध्ये आव्हान

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Rules Change | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) MPSC उमेदवारीच्या प्राधान्यक्रम ठरवणाऱ्या नियमात बदल (MPSC Rules Change) केला आहे. त्यानुसार नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट (ब) पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) PSI पदाच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात Maharashtra Administrative Tribunal (MAT) आव्हान देण्यात आले आहे. मॅटचे न्यायिक सदस्य न्यायाधीश पी. आर. बोरा (Judge P. R. Bora) व प्रशासकीय सदस्य बिजयकुमार (Bijay Kumar) यांनी आयोगाला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र (Affidavit) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी 6 एप्रिल पर्यंत तहकूब केली आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता 7 ऑगस्ट 2019 मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्याचा निकाल २ मार्च 2021 ला जाहीर करण्यात आला होता.
दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियमावली (MPSC Rules Change) 2014 मधील नियम क्रमांक 10 (7) नुसार ज्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण मिळाले असेल त्यांचा प्राधान्यक्रम ठरवताना ज्याची शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) जास्त आहे त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम देण्यात येतो.

दरम्यान, आयोगाने या नियमात बदल करून समान गुण असणाऱ्या उमेदवारांमध्ये प्राधान्यक्रम ठरवताना ज्या उमेदवाराला मुख्य परीक्षेत (Main Exam) जास्त गुण मिळाले आहे त्याला प्राधान्य देण्याचा नियम लागू केला.
त्यानंतर 8 मार्च 2022 ला सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली.
त्यामध्ये नव्या नियमानुसार म्हणजे मुख्य परीक्षेत जास्त गुण असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले होते.
त्यामुळे केदार गरड (Kedar Garad) व श्रीधर डोंगरे (Sridhar Dongre) हे शैक्षणिक अर्हता, तसेच ज्येष्ठ उमेदवार असूनसुद्धा त्यांचा प्राधान्यक्रम खाली आला.
या दोघांनीही ॲड. अमोल चाळक पाटील (Add. Amol Chalak Patil)
यांच्यामार्फत या गुणवत्ता यादीला आव्हान देण्यासाठी ‘मॅट’च्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench)
मूळ अर्ज दाखल केला आहे.

 

Web Title :- MPSC Rules Change | new rules challenge mpscs psi quality list MPSC Rules Change

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा