युट्यूब व्हिडीओ हॅक करून सुचलं दरोड्याबाबत, मुख्य सूत्रधार पुण्यातील MPSC चा विद्यार्थी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नगर रस्त्यावरील दरोड्याचा सुत्रधार पुण्यातील एमपीएससीचा विद्यार्थी असून, उच्चभ्रु घराण्यातील असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, तो युट्यूब व्हिडीओचा चाहता असून, तो हँकिंगचे प्रकार करतो. त्यातून त्याला ही कल्पना सूचली आणि त्याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला आहे, असे सहायक पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांनी मात्र, केवळ कारला लागलेल्या चिखलावरून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

दरोड्यात पोलीसांनी दिपक विलास जाधव (वय 32) व सनी केवल कुमार (वय 29) यांना अटक केली आहे. दिपक हा मुळचा वाघोली परिसरातील आहे. तो विवाहीत असून, त्याचे सासरे कृषी खात्यात मोठ्या पदावर नोकरीस आहेत. त्यांची कार घेऊन त्याने हा गुन्हा केला आहे. याबाबत मात्र, सासर्‍यांना काहीच कल्पना नव्हती. दिपक हा एका खासगी कंपनीत नोकरीस होता. मात्र, ती नोकरी सोडल्यानंतर तो पुण्यात एमपीएससी-युपीएससीचा अभ्यास करत होता. एका परिक्षेत पासही झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्याला युट्यूब पाहण्याची आवड असून, हँकिंगचे प्रकार करतो. त्यातून त्याला ही कल्पना सूचली असल्याचे सांगण्यात आले.

दिपक अत्यंत हुशार आहे. त्याने या गुन्ह्यात स्विफ्ट कारचा वापर केला. त्याला पुण्याची पुर्ण माहिती आहे. त्यामुळे पुण्यात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचेही माहिती होते. त्यामुळे आपण कुठेही सीसीटीव्हीत येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. तो कुठेही सीसीटीव्हीत आला नाही. केवळ तीन आरोपीच काही ठिकाणी सीसीटीव्हीत आले होते. त्याने कार काही अंतरावर पार्क केली होती. त्या कारला क्रमांक प्लेटवर चिखल लागला होता. पोलीसांचे पथक तपास करत असताना पोलीसांना एका ठिकाणी स्विफ्ट कारवर चिखल लागल्याचे लक्षात आले. पोलीसांनी या कालावधीत चिखल कसा लागला याची शहानिशा केली. त्यातून पोलीसांनी या गुन्ह्याचा छडा लावला.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके, सहायक निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी अजित धुमाळ, तुषार भिरवकर, तुषार आल्हाट, चेतन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like