‘मोगॅम्बो’! मिस्टर इंडिया 2 मध्ये ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा मिस्टर इंडिया हा सिनेमा त्या काळी सुपरडुपर हिट झाला. हा सिनेमा आजही चाहत्यांना तितकाच आवडतो. अनेकदा या सिनेमाच्या सीक्वलला घेऊन चर्चा झाली आहे. निर्माते बोनी कपूर यांनी या सिनेमाच्या सेकंड पार्टसाठी नकार दिला होता. परंतु हा या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दिग्दर्शक अली अब्बास जफर मिस्टर इंडिया 2 बनवणार आहे.

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, अली अब्बास जफर लवकरच मिस्टर इंडिया 2 हा सिनेमा घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी रणवीर सिंगच्या नावाला पंसती मिळत असल्याचं समजत आहे. महत्त्वाची बात म्हणजे हा अली जफरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मिस्टर इंडिया 2 हा सिनेमा बिग बजेट सिनेमा असणार आहे. या सिनेमाची स्टोरी आणि प्रीप्रॉडक्शनचं काम सुरू करण्यात आला आहे. असंही समजत आहे की, सिनेमाच्या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्टही तयार करण्यात आला आहे. अली अब्बासची अशी इच्छा आहे की, या सिनेमात अनिल कपूरची भूमिका रणवीर सिंगनं साकारावी. परंतु मोगॅम्बोची भूमिका कोण करणार अद्याप समजलेलं नाही. यासाठी अद्याप अभिनेत्याचा शोध सुरू आहे. सर्वकाठी ठरल्याप्रमाणे होत असेल तर हा सिनेमा 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

मिस्टर इंडिया सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर मिस्टर इंडिया हा सुपरहिट सिनेमा 25 मे 1987 रोजी रिलीज झाला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा चाहत्यांना प्रचंड आवडला होता. आजही हा सिनेमा पाहिला जातो.