Mr. India 2 मध्ये ‘मोगॅम्बो’च्या रोलसाठी ‘या’ खाननं दिली ‘लुक’ टेस्ट, ‘हा’ अभिनेता अनिल कपूरच्या भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी काही दिवसांपूर्वीच मिस्टर इंडिया 2 ची घोषणा केली आहे. या संदर्भातील बातम्यांचा सिलसिलाही काही थांबवण्याचं नाव घेत नाही असं दिसत आहे. अलीकडेच सोनम कपूर आणि मिस्टर इंडिया या पहिल्या पार्टचे डायरेक्टर शेखर कपूर यांनी मिस्टर इंडिया 2 बद्दल नाराजी व्यक्त केली होती. ओरिलजन मिस्टर इंडियाच्या मेकर्स सोबत काहीही बोलणं झालं नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

मिस्टर इंडिया 2 सिनेमाबद्दल आता मोठी माहिती समोर आली आहे. यात असं सांगितलं जात आहे की, मेकर्सनं या सिनेमासाठी बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि रणवीर सिंग यांच्यासोबत एक लुक टेस्ट झाली आहे. एका रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. या लुक टेस्टमध्ये किंग खाननं मोगॅम्बोच्या रोलसाठी भारी भक्कम ड्रेसमध्ये शुट केलं आहे. रणवीरनंही सिंपल कोट पँटमध्ये लुक टेस्ट केली आहे. रणवीरची लुक टेस्ट जर व्यवस्थित झाली तरतो मिस्टर इंडिया 2 मध्ये अनिक कपूरचा रोल साकारणार आहे.

मिस्टर इंडिया 2 सिनेमाची स्टोरी आणि कास्टींगबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु असं मात्र नक्कीच सांगितलं जात आहे की, अली अब्बास जफर हे मिस्ट इंडियाच्या कॉन्सेप्टवर आधारीत एका स्टोरी तयार करत आहे. आता हा सिनेमा अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टारर मिस्टर इंडियाचा रिमेक असेल किंवा मग त्याची स्टोरी पुढे नेणार आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.