Mrunmayee kadam | भाऊ कदमच्या मुलीने दिले सावळ्या रंगावरून बोलणाऱ्यांना सडेतोड उत्तर; तुम्ही हे एखाद्या गोऱ्या मुलीला विचाराल का…?

पोलीसनामा ऑनलाइन – Mrunmayi Kadam | आपल्या हास्यविनोदांनी सर्वांना खळखळून हसायला लावणारा कॉमेडी अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) हा त्यांच्या उत्तम अभिनयामुळे कायम चर्चेत असतो. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहचलेल्या भाऊचे लाखोंनी चाहते आहेत. भाऊ कदम सोबतच त्याची मुलगी मृण्मयी (Mrunmayee kadam) ही देखील आता चर्चेत असते. भाऊ सोबत अनेकदा ती कार्यक्रमांना व इव्हेंटला हजेरी लावत असते. मृण्मयी ही फॅशन (Fashion), मेकअप (Makeup) आणि लाईफस्टाईल (Lifestyle) या क्षेत्रात कार्यरत असून या क्षेत्रात तिने आपली ओळख निर्माण करायला सुरूवात केली आहे. मृण्मयी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीचे व्हिडीओ, रिल्स आणि शॉर्टस् बनवत असते.

Advt.

मृण्मयी ही भाऊ कदमची मुलगी असल्याने तिचा सिनेविश्वासोबतही संबंध येत असतो. अनेकदा ती चला हवा येऊ द्याच्या सेटवर येत असते. तेथील अनेक कलाकारांसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयी कदम आता चर्चेत आली असून याचे कारण म्हणजे तिची एक मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून तिच्या उत्तराला सर्वांची वाहवाह मिळत आहे,

मृण्मयीने नुकताच एका युट्युब चॅनेलला इंटरव्हयु दिला, यामध्ये तिला ‘तिच्या डस्की स्किन टोनमुळे
(Dusky Skin Tone) फॅशन इंडस्ट्रीत काम करताना काही अडचण आली का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा तिने यावर रोखठोक उत्तर दिले. मृण्मयी कदम म्हणाली की, “हा विचार माझ्या डोक्यात कधी आला नाही. कारण मी अशा कुटुंबात वाढली आहे जिथे स्किन टोनवरुन वेगळी वागणूक कधीच दिली जात नाही. आमच्या घरात तर सगळ्यांच्याच त्वचेचा रंग असाच आहे. पण याने काय फरक पडतो. मी युट्यूब सुरु केलं तेव्हा माझ्या डोक्यात असा विचार कधीच आला नाही. त्यात इतका काय विचार करायचा आणि लोकांना का इतका फरक पडतो मला समजतच नाही. मला आत्मविश्वास कुठून आला असं अनेकांनी मला विचारलं. हेच तुम्ही एखाद्या गोऱ्या मुलीला विचाराल का?”

मृण्मयीचे हे बिंधास्त उत्तर अनेकांना भावले आहे. तिचे सावळ्या रंगाबद्दलचे हे स्पष्ट मत ऐकून नेटकरी तिचे
कौतुक करत आहे. रंगावरुन एखाद्याची गुणवत्ता ठरवणाऱ्या लोकांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
मृण्मयी (Mrunmayee kadam) सध्या फॅशन आणि मेकअप क्षेत्रात काम करत आहे.
तिचा एक युट्यूब चॅनल असून यावर ती या संबंधातील कन्टेंट पोस्ट करत असते.
तिचे युट्युब वर आतापर्यंत 42 हजार सबस्क्रायबर्स झाले आहेत.

Web Title :  Mrunmayee kadam | bhau kadam daughter Mrunmayee kadam talks about dusky skin tone look openend her own youtube channel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Violence | कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘आता जे झालं ते झालं, यापुढे…’

Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!

NCP Chief Sharad Pawar | ‘कोल्हापूरमध्ये जे घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही’, हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनानंतर शरद पवारांचं आवाहन