धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्ष पूर्ण, चाहत्यांना हवा त्याचा ‘कमबॅक’, जाणून घ्या MS च्या 19 सर्वोत्तम ‘कामगिरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला दोन दोन वर्ल्ड कप जिंकवून देणार भारताचा अनुभवी विकेटकीपर आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 15 वर्ष पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी असा एकटा कर्णधार आहे ज्यांने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वात भारत आयसीसी वर्ल्ड टी – 20 (2007), क्रिकेट वर्ल्ड कप (2011) आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी (2013) आपल्या नावे केले. याशिवाय 2009 मध्ये भारत पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन बनला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द –
भारतात क्रिकेटमध्ये स्वतःचे नाव कमावण्यासाठी संपूर्ण जीवन व्यथित करावे लागते, त्याठिकाणी धोनीची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली. जुनिअर क्रिकेटमधून बिहार क्रिकेट टीम, झारखंड क्रिकेट संघातून इंडिया-ए टीम पर्यंत आणि तेथून भारतीय संघापर्यंतची त्याची कारकिर्द 5 – 6 वर्षात पूर्ण केले. 1998 मध्ये ज्युनिअर क्रिकेटची सुरुवात केली होती आणि 23 डिसेंबर 2004 मध्ये त्यांनी बांग्लादेशच्या विरोधात वनडे मॅचच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली.

धोनी बांग्लादेशच्या विरोधात पहिली सीरिज काही खास प्रदर्शन करु शकला नाही परंतु पुढील पाकिस्तानच्या सीरिजमध्ये आपल्या पाचव्या वनडे सामन्यात विशाखापट्टनममध्ये 123 चेंडून 148 धावांची खेळू करत सर्वांना हा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केलं की तो लांब केस असलेला मुलगा कोण, धोनी कोण आहे?

महेंद्र सिंह धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व करण्यास 2008 मध्ये स्वीकारली. जेव्हा धोनीने संघाचे नेतृत्व स्वीकारेली तेव्हा त्यांच्या समोर अनेक आव्हाने होती. जसे की तरुणांना संधी देणं आणि भविष्यात संघ निर्माण करणं. धोनीने या सर्व अडचणींचा सामना करत अनेक ऐतिहासिक क्षण भारताला दिले.
डिसेंबर 2014 मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये अचानक संन्यास घेण्याची घोषणा केली, धोनीने 2017 पासून सुरुवात करत वनडे आणि टी-20 कर्णधारला त्याच अंदाज संन्यास घेतला, ज्यासाठी तो ओळखला जातो.

वर्ल्डकप 2019 च्या दरम्यान धोनी आपल्या सावकाश खेळीमुळे टीकेचा धनी ठरला. तो न्यूझीलंडच्या विरोधात सेमीफायनलमध्ये रन आऊट झाला होता, त्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप मधून बाहेर पडला आणि धोनीने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला. या दरम्यान धोनीने टेरिटोरिअल आर्मी युनिटबरोबर काश्मीरमध्ये 15 दिवस घालवले.
वर्ल्ड कप नंतर तो कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सीरिजचा भाग राहिला नाही. मानले जात होते की धोनी 2019 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेईल परंतू असे झाले नाही. येवढेच काय तर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी देखील धोनीच्या क्रिकेटमध्ये परतण्याचे संकेत दिले. रवि शास्त्री एका मुलाखतीत म्हणाले की धोनीने ब्रेक घेणं समजूतदारपणाचे आहे. मी त्या वेळेची वाट पाहत आहे जेव्हा धोनी पुन्हा मैदान उतरेल.

धोनीची कामगिरी –
1 क्रिकेट वर्ल्ड कप (2011),
2 टी – 20 वर्ल्ड कप (2007)
1 चॅम्पियन ट्रॉफी (2013),
3 आयपीएल (2010,2011,2018),
2 चॅम्पियन लीग टी – 20 (2010, 2014),
10,773 वनडे रन तसेच 444 बाद
4,876 कसोटी सामन्यात धावा तसेच 294 बाद
1,617 टी – 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावा तसेच 91 बाद

वनडे आंतरराष्ट्रीय कामगिरी –
धोनीने भारतासाठी आतापर्यंत 350 वनडे सामन्यात 50.57 च्या सरसरीने 10,773 धावा केल्या. ज्यात 10 शतक आणि 73 अर्ध शतकांचा समावेश आहे. या दरम्यान बेस्ट स्कोर नाबाद 183 धावा केल्या, वनडे मध्ये धोनीच्या नावे 1 विकेट आहे तर त्याची उत्तम कामगिरी 14 धावा देऊन 1 विकेट आहे.

कसोटी सामन्यातील कामगिरी –
धोनीने भारतासाठी आता पर्यंत 90 कसोटी सामने खेळून 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या, ज्यात 6 शतक आणि 33 अर्ध शतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याचा बेस्ट स्कोर 224 धावांचा आहे.

टी – 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी –
धोनीने भारतासाठी 98 टी – 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळत 37.60 च्या सरसरीने 1617 धावा केल्या, ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याच्या धावांचा उत्तम स्कोर 56 धावा राहिला.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/