MS Dhoni | धोनीचा मेणाचा पुतळा बनवणाऱ्यावर चाहत्यांकडून संताप

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) गणना जगातील उत्कृष्ट कर्णधारांमध्ये आजही केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेता झाला आहे. धोनीने (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन (Cricket) निवृत्ती घेतली. मात्र, अजूनही त्याच्या चाहत्यांमधली क्रेझ कमी होताना दिसत नाही.

 

कर्नाटकातील (Karnatak) म्हैसूर येथील चामुंडेश्वरी वॅक्स म्युझियमने (Chamundeshwari Wax Museum) एमएस धोनीच्या (MS Dhoni) मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे या पुतळ्यावर धोनीचे चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. धोनीचा हा पुतळा पाहिल्यानंतर त्याचे चाहते मीम्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. हा पुतळा धोनीसारखा दिसत नसून पाकिस्तानच्या एका खेळाडूसारखा दिसत असल्याचा दावा त्याच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

 

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने (Mahendrasingh Dhoni) त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत.
कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत.
धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 4 हजार 876 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत.
यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत.
धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले असून त्याने त्यामध्ये एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.

 

Web Title :- MS Dhoni | a picture of mahendra singh dhoni s wax statute in karnataka s mysore is going viral on the internet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर आरोप, म्हणाले, राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष, शिवसेनेला पद्धतशीरपणे…

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

T20 World Cup 2022 | जसप्रीत बुमराहची जागा घेणार मोहम्मद शमी, 2-3 दिवसांत ऑस्ट्रेलियाला होणार रवाना