जेव्हा धोनीसारख्या खेळाडूला फरशीवर झोपावे लागते

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – देशभर सध्या आयपीएल फिव्हर सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर सोशल मीडिया प्लँटफॉर्म वर देखील खूप प्रसिद्ध आहे. सध्या धोनीचा सोशल मीडियावर एक फोटो भलताच व्हायरल होतो आहे. हा फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे या फोटोत धोनी आणि त्‍याची पत्‍नी साक्षी विमानतळावर विमानाची वाट पाहत असल्‍याचे दिसत आहे.

त्याचे झाले असे की, मंगळवारी धोनीच्या संघाने चेन्नईत KKR कोलकाता नाइट राय़डर्सवर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर धोनीच्या संघाला पुढच्या सामन्यासाठी जयपूरला जायचे होते. या दरम्यान विमानतळावरील फोटो धोनीने शेअर केला आहे. या फोटोत धोनी आणि त्याची पत्नी विमानतळावर बॅग डोक्याखाली घेऊन फरशीवरच झोपलेले दिसत आहेत. या फोटोबाबत धोनीने म्हंटले आहे की, ‘आयपीएलच्या वेळेची सवय झाल्यानंतर आणि सकाळी लवकर विमान असले की असेच होते’. जगभरात नावलौकिक मिळवलेले असतानही धोनीसारखा प्रसिद्ध खेळाडू फरशीवर झोपतो. धोनीच्‍या याच साधेपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us