MS Dhoni | IPS अधिकाऱ्याच्या विरोधात महेंद्रसिंग धोनीची याचिका, काय आहे संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आयपीएस अधिकारी संपत कुमार (IPS Officer Sampath Kumar) यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल केली आहे. धोनीने (MS Dhoni) आपल्या याचिकेत आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्यावर वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील (IPL-2013) मॅच फिक्सिंग (Match fixing) आणि सट्टेबाजीशी (Betting) निगडित आहे.

न्यायालयाने धोनीची (MS Dhoni) हि याचिका मान्य केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपासून होणार आहे. दरम्यान, आयपीएल 2013 मध्ये फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी (Betting) संबंधित प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी संपत कुमार करत होते. याप्रकरणी त्यांनी महेंद्रसिंग धोनीवरही टिप्पणी केली होती. यानंतर धोनीने आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले कि आयपीएस अधिकारी संपत कुमार हे स्पॉट फिक्सिंगवरून (Spot Fixing) माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याविरोधात खोट्या बातम्या आणि खोटी वक्तव्ये करत आहेत. यानंतर धोनीने कोर्टाकडे 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली होती.

त्यानंतर 2014 मध्ये न्यायालयाने संपत कुमार यांना महेंद्रसिंग धोनीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास
मनाई केली. मात्र त्या नंतरदेखील संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रतिज्ञापत्र दाखल
केले होते. ज्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे
प्रमुख वकील यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपासून पार पडणार आहे.

Web Title :-  MS Dhoni | former indian skipper ms dhoni files contempt of court plea against ips officer in madras hc

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | नवाब मलिकांना धक्का, ईडीला मिळाली वांद्रे, कुर्ला आणि उस्मानाबाद येथील संपत्ती जप्त करण्याची परवानगी