MS Dhoni | “तुझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य गिफ्ट कोणतं?”, धोनीच्या उत्तराने ॲंकरची झाली बोलती बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) सेलिब्रिटी टॉक शो होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या शोमध्ये मंदिरा बेदी महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) एक प्रश्न विचारतात यानंतर महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धोनीच्या या उत्तरामुळे काही जणांनी धोनीच्या या स्पॉट रिस्पॉन्सचे कौतुक केले आहे तर काही जण धोनीवर टीका करताना दिसत आहेत.

 

हा व्हिडिओ 2016 च्या मुलाखतीचा आहे. या शोमध्ये ॲंकर बेदी धोनीला (MS Dhoni) त्याच्या आयुष्यात मिळालेल्या सर्वात मौल्यवान भेटवस्तूबद्दल विचारणा करते. यानंतर धोनी उत्तर सांगण्यासाठी थोडा वेळ विचार करतो तेव्हा मंदिरा बेदी यांनी धोनीला हिंट देताना सांगितले की, त्याला मिळालेली सर्वात मोठी भेट म्हणजे त्याची मुलगी.

 

धोनीच्या उत्तराने पिकला हशा
यावेळी धोनीने मंदीरा बेदी यांनी सुचवलेल्या उत्तराला पूर्णपणे नकार दिला.
यानंतर धोनी म्हणाला कि, “मी यासाठी खूप मेहनत घेतली होती त्यामुळे ही भेटवस्तू नव्हती.”
धोनीच्या या उत्तराने ॲंकर बेदी यांच्यासहीत प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काही युजर्स धोनीच्या या स्पॉट उत्तराचे कौतुक करत आहेत, तर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत.

 

Web Title :- MS Dhoni | funny part of ms dhonis interview with mandira bedi is going viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार

Mohan Bhagwat | मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा संताप, तुम्ही देशात जातीयवाद वाढवताय, इथला हिंदू नराधमांच्या…