MS धोनीच्या भवितव्याबद्दल BCCI चं स्पष्टीकरण, वर्ल्ड कपच्या टीममध्ये मिळणार ‘संधी’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BCCI च्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, सिलेक्शन कमिटीमध्ये अध्यक्षांसह दोन नव्या सदस्यांच्या येण्याने देखील एम एस धोनीसंबंधित कोणतेही बदल केलेले नाहीत आणि त्याला टी – 20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये जागा बनवण्यासाठी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागेल.

सुनील जोशींच्या अध्यक्षतेत निवड समितीची रविवारी अहमदाबादमध्ये पहिल्या बैठकीत दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाची निवड केली गेली.

हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवनने संघात जागा बनवली आहे. मागील अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले होते की धोनीला संघात जागा तयार करण्यासाठी चांगले प्रदर्शन करावे लागेल.

जुलैमध्ये न्यूझीलँडच्या विरोधात वर्ल्ड कप सेमीफायनल नंतर धोनी क्रिकेटपासून दूर झाला. तो 29 मार्चला सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये वापसी करेल. बोर्डाच्या सूत्रांनुसार, बैठकीत फक्त मुद्यांवर चर्चा झाली. आताच्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात धोनी निवडीच्या रेसमध्ये नव्हता आणि त्याच्यावर काही बोलणे देखील झालेले नाही.

बोर्डाच्या सूत्रानुसार, आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यास धोनीची वापसी होईल. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या वरिष्ठ आणि तरुण खेळाडूंना देखील ही नियम लागू आहे. चांगले प्रदर्शन केल्यास त्यांच्या नावावर विचार होईल. काही नव्या किंवा जुन्या खेळाडूंची देखील निवड होऊ शकते.

टी – 20 वर्ल्ड कप ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये खेळवण्यात येईल. मुख्य कोच रवी शास्त्री यांनी संकेत दिले की आयपीएलमध्ये धोनीचे प्रदर्शन चांगले राहिले तर त्याची वापसी होऊ शकते. ऋषभ पंतचे खराब प्रदर्शन पाहून के एल राहुल कडून विकेटकीपिंग करुन घेतले जाणार आहे ज्यामुळे धोनीच्या वापसीच्या शक्यता नाकारता येऊ शकत नाहीत.