Birthday SPL : MS धोनीच्या वाढदिवसानिमित्त DJ ब्रावोनं रिलीज केलं ‘खास’ गाणं ! सोशलवर प्रचंड व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आज (मंगळवार दि 7 जुलै 2020 रोजी) 39 वर्षांचा झाला आहे. आज माही त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. माहीचे चाहतेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. खास बात अशी की, आयपीएलमध्ये महेंद्र सिंह धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्सचा जबरदस्त ऑलराऊंडर ड्वेन ब्रावो यानं तर धोनीला खास गिफ्ट दिलं आहे. म्युझिकमध्ये रस असणाऱ्या डीजे ब्रावोनं धोनीसाठी खास गाणं तयार केलं आहे याचा टीजरही नुकताच रिलीज करण्यात आला होता. आता ब्रावोनं गाणं रिलीज केलं आहे.

डीजे ब्रावोनं त्याच्या युट्युब चॅनलवर धोनीसाठीचं खास गाणं रिलीज केलं आहे. हेलिकॉप्टर 7 असं या गाण्याचं नाव आहे. यात धोनीची पूर्ण कहाणी दाखवण्यात आली आहे. खास बातअशी की, काही तासातच या गाण्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

काय आहे गाण्यात ?

हेलिकॉप्टर 7 या गाण्यात धोनीनं आतापर्यंत जे काही यश मिळवलं आहे त्याबद्दल सांगण्यात आलं आहे. यात आयसीसीमधील सर्व ट्रॉफींचा समावेश आहे. यात त्यानं धोनीच्या फलंदादजीचे काही जुने फुटेज वापरले आहेत. या गाण्यातून ब्रावोनं अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या मध्ये मध्ये डीजे ब्रावोदेखील काही स्टेप्स करताना दिसत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like