MS Dhoni | न्यू जर्नी : महेंद्र सिंह धोनी तमिळ फिल्म करणार प्रोड्यूस, पहिल्या चित्रपटात नयनतारा असेल लीड एक्ट्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – MS Dhoni | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आता क्रिकेट जगताव्यतिरिक्त चित्रपट निर्मिती (Film Making) मध्ये उतरणार आहे. धोनी तमिळ चित्रपटसृष्टीत (Tamil film industry) निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी धोनीने अभिनेता रजनीकांत (Actor Rajinikanth) चा जवळचा सहकारी असलेल्या संजयची नियुक्ती केली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (South actress Nayanthara) मुख्य भूमिकेत दिसणार असेल. (MS Dhoni)

 

धोनीचा तामिळ उद्योगाशी संबंध
मीडिया रिपोर्टनुसार, धोनी सध्या IPL मध्ये व्यस्त असून या सीझननंतर तो या चित्रपटाची अधिकृत घोषणा करू शकतो. चित्रपटाचे शूटिंगही याच महिन्यात सुरू होणार आहे. धोनीचे तामिळ चित्रपटसृष्टीशी पूर्वीपासून संबंध आहेत. अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या ’एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ (‘MS Dhoni: The Untold Story’) या बायोपिकच्या प्रमोशनमध्येही हा क्रिकेटर सहभागी होता. त्याच्या बायोपिकने दक्षिणेकडील राज्यांमध्येही चांगली कमाई केली. (MS Dhoni)

 

नयनताराचा वर्कफ्रंट
नयनतारा सध्या तिच्या आगामी बॉलीवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये तिचे बॉलिवूड पदार्पण होणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान दिसणार आहे. त्याचबरोबर अ‍ॅटली चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
याशिवाय ती काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप तिच्या भूमिकेची अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

Web Title :- MS Dhoni | mahendra singh dhoni will produce the tamil film nayanthara will be the lead actress in the first film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Major Accident in Jalgaon | दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

 

Pune Police | बदली होऊनही गैरहजर राहणारे पुण्यातील 3 पोलीस अंमलदार निलंबित

 

Mukul Madhav Foundation | फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे पालघरच्या आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम