MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीने सोडलं CSK चं कर्णधारपद; ‘या’ खास ‘भिडू’कडे ‘माही’ने सोपवली जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MS Dhoni | दोन दिवसांवर आयपीएल (IPL 2022) आली असताना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) सर्वांना धक्का दिला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा (MS Dhoni Resignation Of Captaincy) दिला आहे.

 

महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडल्यावर आता सीएसकेचं नेतृत्त्व रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) सोपवण्यात आलं आहे. धोनीने आत्तापर्यंत चारवेळा विजेतेपद (IPL Championsh) जिंकून दिलं आहे तर 9 वेळा संघाला अंतिम सामन्यात पोहोचवलं आहे. धोनीच्या निर्णयाने सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

धोनीने आत्तापर्यंत 204 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यातील त्याने 121 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यासोबतच महेंद्र सिंह धोनी हा 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवणारा पहिला खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी (Successful Captain) धोनी एक आहे. आयपीएलमध्येही धोनीने सीएसकेला यश मिळवून दिलं आहे.

 

दरम्यान, सीएसकेने धोनीनंतर (Mahendra Singh Dhoni) जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएलचा यंदाच्या सीझनचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (CSKvsKKR) यांच्यात होणार आहे.
त्यामुळे आता या सीझनमध्ये जडेजाच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष राहणार आहे.

 

Web Title :- MS Dhoni | ms dhoni has step down as csk captain he announced ipl captaincy jadeja new captain chennai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले – ‘…पण दोन हात करायची वेळ आली तर कमी पडणार नाही’

 

Solapur Crime | करमाळ्यात नात्याला काळिमा फासणारी घटना! चुलत भावाने केले अल्पवयीन बहिणीशी लग्न

 

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई