काय आहे BCCI चं सेंट्रल ‘कॉन्ट्रॅक्ट’, ज्यामधून अचानकपणे बाहेर केलं गेलं MS धोनीला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BCCI ने गुरुवारी भारतीय खेळाडूंची वार्षिक कराराची यादी जाहीर केली. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 बाबतच्या यादीतून महेंद्र सिंह धोनीचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे जाणून घेऊयात नेमका कसला आहे हा करार ज्यामधून धोनीला वगळण्यात आलेले आहे.

बीसीसीआय चार श्रेणीमध्ये खेळाडूंची वर्गवारी करते. याचे वर्गीकरण ग्रेड A+, ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C अशा पद्धतीने केले गेले आहे. ग्रेड A+ मधील खेळाडूंना बोर्डाकडून वर्षाला सात कोटी रुपये दिले जातात. तर ग्रेड A मध्ये पाच कोटी वार्षिक, ग्रेड B मध्ये तीन कोटी वार्षिक, तर ग्रेड C मध्ये एक कोटी वार्षिक रुपये खेळाडूला दिले जातात.

काय आहे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
बोर्ड एका वर्षासाठी कोणत्याही खेळाडूला करारबद्ध करते त्यानुसार जो पण खेळाडू करारामध्ये सामील असतो त्याला बोर्डाच्या योजनांमध्ये देखील समाविष्ट केले जाते. जसे की टीम निवड आणि एखाद्या दौऱ्यासाठी खेळाडूंची निवड करणे.कोणता खेळाडू संघात किती वेळ खेळतो याकडे देखील बोर्डाचे लक्ष असते. या करारामध्ये A+ मध्ये केवळ तीन नावे, A मध्ये 11 खेळाडू, ग्रेड B मध्ये पाच नावे आणि ग्रेड C मध्ये आठ खेळाडूंचा समावेश केलेला असतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like