यशामुळे धोनी कोहलीसारखा हवेत गेलेला नाही

वेलिंग्टन : वृत्तसंस्था- भारताच्या संघाचे आज न्यूझीलंडमध्ये आगमन झाले. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे विमानतळावर दाखल झाले. पण चाहत्यांना मात्र यावेळी दोन भिन्न अनुभव यावेळी आले. तुम्ही व्यवसायाने कोण आहात त्यापेक्षा एक माणूस म्हणून तुम्ही इतरांशी कसं वागता हेही महत्त्वाचं असतं याचा प्रत्यय क्रिकेटच्या चाहत्यांना आज आला. यशामुळे धोनी हवेत गेलेला नाही याची प्रचिती यावेळी आली.

विराट आणि अनुष्का जेव्हा आपल्या सामानासह विामानतळाबाहेर आले तेव्हा चाहत्यांनी त्यांच्याभोवती गर्दी करत त्यांना चीअर केले. चाहत्यांना दोघांच्या स्वाक्षरा घ्यायच्या होत्या. परंतु दोघांनीही चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली नाही. याऊलट विराट आणि अनुष्का यांनी मात्र चाहत्यांचा हिरमोड केल्याचे दिसून आले.

याचवेळी धोनी जेव्हा  विामानतळाबाहेर आला तेव्हा त्याच्याभोवतीही चाहत्यांनी गलका करत गर्दी केली. यावेळी काही चाहत्यांनी धोनीकडे स्वाक्षऱ्यांची मागणी केली. यावेळी धोनीने मात्र त्याच्या चाहत्यांचा हिरमोड केला नाही. धोनी चाहत्यांना सोडून पुढे गेला नाही. उलट चाहत्यांसाठी धोनी थांबला. त्याने चाहत्यांना स्वाक्षऱ्या दिल्या, त्याचबरोबर चाहत्यांना आपल्याबरोबर फोटोही काढायला दिले.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यामध्ये भारतीय संघ झीलंडमध्ये पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारताच्या एकाही खेळाडूची पत्नी नव्हती, पण कोहली आपल्या पत्नीबरोबर आल्यावर चाहत्यांनी एकच कल्ला केल्याचे दिसून आले. दरम्यान  या दौऱ्याला 23 जानेवारीला पहिल्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार आहे.