सैन्य प्रशिक्षणादरम्यान ‘धोनी’ने लुटला लहान मुलांबरोबर ‘क्रिकेट’ खेळण्याचा ‘आनंद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी काश्मीरमध्ये १५ दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आर्मी ट्रेनिंगमधून आता परत आला आहे. धोनी ३१ जुलै पासून १५ ऑगस्टपर्यंत काश्मीरमध्ये तैनात होता. धोनी सैन्यात आपल्या प्रशिक्षणादरम्यान श्रीनगर, कुपवाडा, उरी आणि लेहमध्ये होते. यावेळी महेंद्र सिंह धोनीने पिटी परेड, ऑफिस ड्युटी, सशस्त्रात्र चालवण्याचे प्रशिक्षण घेता घेता क्रिकेट खेळण्याचा आंनद लुटूला.

मुलांबरोबर बास्केटबॉल कोर्टवर क्रिकेट खेळताना धोनीचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये धोनी बॉल हिट करताना दिसत आहे. धोनीने लद्दाखमध्ये क्रिकेट अकादमी बरोबर देखील खेळण्याचे आश्वासन दिले आहे.

३८ वर्षींय धोनीने एक्टिव क्रिकेटमधून दोन महिन्याचा ब्रेक घेतला आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलँडने भारताचा पराभव केल्यानंतर धोनीने क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि काश्मीरमध्ये आपल्या रेजिमेंटमध्ये सेवा देण्यासाठी पोहचला. धोनी टेरिटोरिअल आर्मी – १०६ टीए बटालियन बरोबर जम्मू काश्मीरमध्ये ३० जुलैपासून सहभागी झाला आहे. त्यांने दोन आठवड्यानंतर बटालियन बरोबर प्रशिक्षण घेतले आहे.

या आधी धोनी वॉलीबॉल खेळताना तर कधी बूट पॉलिश करताना दिसून आला. लेहवरुन परत येताना लेह एअरपोर्टवर सामान्य लोकांप्रमाणे तपासताना पाहिले. एअरपोर्टवर धोनीवर अनेकांबरोबर फोटो देखील काढले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like