काय होतं MS धोनीच्या निवृत्तीचं आणि 15 ऑगस्टचं ‘कनेक्शन’ ? मॅनेजरनं केला मोठा खुलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या निवृत्तीचा आणि 15 ऑगस्टचा काय संबंध होता याचा खुलासा धोनीच्या मॅनेजरने केला.

धोनीचा मॅनेजर मिहीर दिवाकरने सांगितलं की, धोनीच्या निवृत्तीसाठी 15 ऑगस्टपेक्षा दुसरा कोणता दिवस चांगला असूच शकत नाही. यामधून धोनीची देशभक्ती दिसून येते.

धोनीच्या मॅनेजरने सांगितलं, धोनीची संपूर्ण कारकीर्द भारतासाठी होती. आणि लोकांनी जे त्याला प्रेम दिले ते अद्वितीय होते.

धोनीच्या निवृत्तीसाठी 15 ऑगस्टपेक्षा दुसरा कोणता दिवस शुभ असूच शकत नाही. कारण त्याची कारकीर्द भारताला समर्पित आहे.

मॅनेजरने हेही सांगितलं की, धोनी मागील काही आठवड्यांपासून निवृत्तीबद्दल चर्चा करत होता,पण योग्य वेळ त्यालाही माहित नव्हती.

धोनी कर्णधार असताना भारताने आयसीसी वर्ल्ड टी-20 (2007), क्रिकेट वोर्ल्डकप (2011) आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी (2013) असा विक्रम केला होता. 2014 साली अचानक सराव संन्यातून निवृत्ती घेतली होती. टी-20 ला देखील त्याने अशाच पद्धतीने अलविदा केलं होतं.