‘या’ अभिनेत्याची धोनीच्या वाढदिवसाला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली, मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यावर महेंद्रसिंग धोनीकडून अद्याप काहीही प्रतीक्रिया आलेली असून अनेक मोठ्या खेळाडूंनी या प्रकरणावर आपली मते व्यक्त केली आहेत.

यानंतर आता धोनीच्या निवृत्तीवर एक अभिनेता पुढे आला आहे. ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेतील आघाडीचा अभिनेता अंश बागडी याने धोनीच्या निवृत्तीवर व्यक्त केलेलं मत मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्याने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य करताना म्हटले कि, धोनीवर भारतातील सर्वच जण प्रेम करतात. धोनी भारतीय संघाला आणि क्रिकेटच्या एका वेगळ्याच पातळीवर घेऊन गेला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक सुधारणा केल्या असून त्याची निवृत्ती यादगार व्हायला हवी. त्याचप्रमाणे धोनीच्या चाहत्यांनी त्याचा निवृत्तीचा दिवस सण साजरा केल्यासारख्या करायला हवा.

दरम्यान, पुढे बोलताना तो म्हणाला कि, धोनीचा चाहता म्हणून मला असे वाटते कि, धोनीच्या वाढदिवसाच्या दिवसाला सार्वजनिक सुट्टी घोषित करायला हवी. धोनी एक परफॉर्मर आहे आणि ज्या प्रकारे तो षटकार मारून सामना संपवतो ते मला फार आवडते. धोनीने अद्याप क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली नसून तो दोन महिने सुट्टीवर असून त्याने भारतीय सैन्यात सेवा करणार असल्याचे सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –