ICC World Cup 2019 : महेंद्रसिंह धोनीच्या ‘RunOut’ बाबात न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचं ‘हे’ वक्‍तव्य !

लंडन : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनल सामन्यात मार्टिन गप्टिलने महेंद्रसिंग धोनीला धावचीत केले आणि भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा मावळल्या. मार्टिनने थेट हिट मारत धोनीला धावचीत केले. भारत हा सामना फक्त १८ धावांनी हरला. धोनी शेवट्पर्यंत क्रीजवर टिकून राहिला असता तर हा सामना भारत जिंकू शकला असता पण मार्टिनने थेट थ्रो मारत धोनीला आऊट केले आणि भारत वर्ल्डकपमधून बाहेर पडला. यामुळे भारतीय संघासोबत कोट्यवधी भारतीय चाहते नाराज झाले.
सेमीफाइनल में धोनी के रनआउट पर बोले गप्टिल, जहन में चल रही थी ये बात

धोनीला रन आऊट करणाऱ्या मार्टिनने या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ICC ने मार्टिन गप्टिलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे त्या व्हिडिओत मार्टिनने म्हंटले की, मी भाग्यशाली ठरलो की थेट थ्रो मारून धोनीला बाद केले. मी लवकरात लवकर चेंडूजवळ पोहचण्याचा प्रयत्न केला. मी भाग्यशाली राहिलो की कठीण अँगलमध्ये देखील मी थेट थ्रो मारण्यास यशस्वी ठरलो.

महेंद्रसिंग धोनीने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फर्गुसनच्या ४९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगला थांबलेल्या मार्टिन गप्टिलने थेट थ्रो मारून धोनीला धावबाद केले. यामुळे न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला. धोनीने डाइव्ह मारली असती तर धोनी धावबाद झाला नसता अशा प्रतिक्रिया देखील काहींनी नंतर व्यक्त केल्या.
सेमीफाइनल में धोनी के रनआउट पर बोले गप्टिल, जहन में चल रही थी ये बात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like