संघात नसताना देखील धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगभरात भारताचं नाव उंचावलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम : ‘कॅप्टन कुल’ अर्थात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. परंतु तरीही चाहत्यांच्या मनातील धोनीची जागा कायम आहे. त्यात आता धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ज्यामुळे त्याचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.

काही दिवसांत नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे २०१९ सोबतच गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वोत्तम खेळाडूंची यादी तयार केली जात आहे. या यादीनुसार गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या नावे आहे. मात्र त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांमध्ये यष्ट्यांमागे सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर जमा झाला आहे. धोनीने २०१० ते २०१९ या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक २४२ बळी घेतले आहे. धोनीपूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. २००० ते २००९ या दहा वर्षांमध्ये गिलख्रिस्टने ३६२ बळी मिळवले होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी धोनीने आपल्या ग्लोव्हजवर आर्मीचा लोगो लावला होता. धोनी हा भारतीय आर्मीचा एक सदस्य आहे. त्याला मानदपदही देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील विश्वचषकानंतर तो आर्मीबरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये सराव करण्यासही गेला होता. मात्र, धोनीने ग्लोव्हजवर लोगो लागल्याचे व्हायरल झाले असता त्याला हा लोगो काढण्यास सांगितले गेले. वाढता दबाव पाहता धोनीनेही हा लोगो आपल्या ग्लोव्हजमधून काढला होता. पण जर पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडत असेल, तर धोनीने लोगो वापरण्यात गैर काय आहे, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत.

सध्याच्या घडीला पाकिस्तानी संघातील हिंदू क्रिकेटपटूंना नमाज पडण्यावर सक्ती असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. पण पाकिस्तानचा संघ मैदानात नमाज पडू शकतो, तर भारताचा माडी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आर्मीचा लोगो ग्लोव्हजवर का वापरू शकत नाही, असा सवाल आता नेटकऱ्यांनी विचारला आहे.

दरम्यान, सध्या धोनीऐवजी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच पंतलाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने सर्वात जास्त संधी दिली जात आहे. मात्र, अनेक संधी देऊनही पंत हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/