स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी महेंद्रसिंह धोनी लडाखमध्ये, ट्रेनिंगचा आजचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज स्वतंत्र्यदिन साजरा करत आहे. प्रादेशिक सेनेच्या लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या धोनीने आज लडाखमध्ये स्वतंत्रदिन साजरा केला. तो मागील पंधरा दिवस जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षणासाठी तैनात होता. स्वतंत्रदिनानिमित्त लडाखमध्ये गेल्यावर तेथील सेनाधिकाऱ्यांनी सलामी देत त्याचे स्वागत केले. यावेळी त्याने आर्मी जनरल हॉस्पीटलचा दौर करत तेथील रुग्णांना स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या दौऱ्यात तो सियाचिनमध्येही जाऊ शकतो. सर्वाधिक उंचावर राहणारे जवान तेथील वातावरणात कसे राहतात, ट्रेनिंग घेतात याची दखल तो घेईल. दौऱ्यात तेथील युद्ध स्मारकाला, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिले.

आरोग्यविषयक वृत्त –