MS Dhoni | ‘…म्हणून धोनीने घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय’; CSK च्या सीईओंनी सांगितली अंदर की बात

मुबंई : पोलीसनामा ऑनलाइन – MS Dhoni | आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामाला सुरूवात होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. मात्र दोन दिवसांआधी महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. धोनीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र अशातच चेन्नईच्या संघाचे सीईओ काशी विश्वनाथ (CSK Team CEO Kashi Vishwanath) यांनी याबाबत खुलासा केला आहे.

 

संघाचे कर्णधारपद सोडण्याबाबत महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) खूप आधीपासूनच निर्णय घेतला होता. त्याला वाटलं ही योग्य वेळ आहे रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) नेतृत्त्व सोपवण्याची, असं काशी विश्वनाथ म्हणाले.

 

जडेजा त्याच्या कारकीर्दीतील उत्तम टप्प्यातून जात आहे त्यामुळे सीएसकेचा कर्णधार म्हणून त्याच्यासाठी ही योग्य वेळ आहे. जेव्हा संघ सरावादरम्यान जात होता त्याचवेळी धोनीने कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितलं असल्याचंही काशी विश्वनाथ यांनी सांगितलं.

 

दरम्यान, फ्रेंचायझीचा कर्णधार म्हणून रविंद्र जडेजावर पूर्ण विश्वास आहे.
त्यासोबतच त्याला महेंद्र सिंह धोनीचं मार्गदर्शनही मिळेलच, मात्र जडेजासाठी शिकण्याची मोठी संधी असल्याचंही विश्वनाथ यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MS Dhoni | why dhoni step down as captaincy kashi viswanathan tell the truth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा