…म्हणून साक्षीने धोनीच्या निवृत्तीबद्दलचे ट्विट केले डिलीट

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या संबंधी ट्विटरवर धोनी रिटायर हॅशटॅग ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे धोनीची पत्नी साक्षीने थेट ट्विटर अकाऊंटवरून सगळ्या निव्वळ अफवा आहेत. लॉकडाउनमुळे सध्या काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. असे ट्वीट केले. लोकांनी स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावे, असे साक्षीने ट्विट केले. साक्षीने ते ट्विट काही वेळाने डिलीट करून टाकले. ते ट्विट डिलीट करण्यामागचे कारण तेव्हा कळू शकले नव्हते.

मुलाखतीत साक्षीने त्यामागचा विचार सांगितला आहे. मला माझ्या एका मित्राने त्या हॅशटॅगबद्दल माहिती दिली. नक्की काय चाललंय? दुपारपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा ट्विटरवर आहेत. मी ते ऐकून एकदम स्तब्ध झाले. मला कळत नव्हते की काय करावे. मला माहिती नाही की मला काय झाले पण मी ते ट्विट करून टाकले आणि थोड्या वेळाने डिलिट केले. त्या ट्विटने टीकाकारांना उत्तर मिळाले होते. असे तिने सांगितले.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी आशा व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती. या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली.