‘चेन्नई सुपरसिंग्स’ MS धोनीला बाहेरचा रस्ता दाखवणार, काय आहे सत्य ?, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या आयपीएलची खूप चर्चा सुरू आहे. चेन्नई सुपरकिंग्स टीम कर्णधार महेंद्रसिंग धोनीला नारळ देण्याचा विचार करत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक संघ काही खेळाडूंना नारळ देत आहे तर काहींना संघात ठेवत आहे. अशात धोनीला नारळ देण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही असा प्रश्नही सर्वांना पडला आहे. कारण सध्या तो क्रिकेटपासून लांब असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमधील वर्ल्ड कपनंतर धोनीनं कोणताही सामना खेळवला नाही. इतकेच नाही तर त्याला भारताच्या टी 20 संघापासूनही दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आयपीएलमध्ये तो खेळतो की, नाही असा प्रश्न समोर येत आहे.

दरम्यान चेन्नई सुपरकिंग्सच्या एका ट्विटवर एका चाहत्यानं म्हटलं आहे की, चेन्नई सुपरकिंग्स संघानं धोनीला नारळ देण्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपरकिंग्स संघानं एक ट्विट केलं होतं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आम्ही 5 खेळाडूंना संघातून बाहेर काढत आहोत.

दरम्यान चाहत्यानं जे म्हटलं आहे त्यानंतर चेन्नईच्या संघानं त्याला उत्तरही दिलं आहे. चाहत्याला उत्तर देताना चेन्नईच्या संघानं म्हटलं की, “धोनी हा संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुमच्याकडे असलेली माहिती चुकीची आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like