MS धोनी T – 20 वर्ल्डकप खेळणार ? ‘या’ सहकार्‍यानं केला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय विश्वकप झाल्यापासून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. कुटुंबाला वेळ देण्यासाठी धोनीने अनेक दिवस सुट्टी घेतली होती. त्यानंतर झालेल्या वेस्टइंडीज, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकांमध्ये देखील धोनी खेळला नव्हता, त्यामुळे आता धोनी आगामी टी 20 विश्वचषकात खेळणार का ? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

मात्र धोनी आगामी टी 20 विश्वचषक खेळणार आहे. असे मत चेन्नई सुपर किंग्ज जा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने व्यक्त केले आहे. धोनीमधील क्रिकेट अद्याप संपलेले नाही, स्वत: वर विश्वास ठेवा असा मंत्र धोनीने आम्हाला दिला आहे. असे मत ब्राव्होने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.

ब्राव्होने निवृत्ती घेतली मागे
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आपली निवृत्त मागे घेत आगामी मालिकेमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ब्राव्होनं ऑक्टोबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, मात्र आता त्याने आगामी ट्वेंटी – 20 वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/