BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं MS धोनीच्या भवितव्याबद्दल मोठं ‘वक्तव्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या प्रत्येक क्रिकेट प्रेमींमध्ये एकच चर्चेचा मुद्दा दिसत आहे तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य आणि त्याची निवृत्ती. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनंही याबद्दल मोठं विधान केलं आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ असून याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. याबबत कोणताही संभ्रम नसल्याचं गांगुलीनं म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यानं आपल्या भूमिका मांडल्या आहेत.

सौरव गांगुली म्हणाला, “महेंद्रसिंग धोनीबद्दल सर्व समिती सदस्यात एकवाक्यता आहे. धोनीसारख्या खेळाडूंबद्दल निर्णय घेताना काही गोष्टी बंद दाराआड ठरवाव्या लागतात. याबद्दल जाहीर निर्णय घेतला जाऊ शकत नाही.” मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं की, “आगामी आयपीएलमध्ये धोनी कसा खेळतो यावर भारतीय संघात त्याचं भवितव्य ठरणार आहे.” दरम्यान सौरव गांगुलीनं केलेल्या वक्तव्यामुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे.

मध्यंतरीच्या काळात भारतीय संघात धोनीला स्थान देण्याची मागणी होत होती. कारण धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात निवड सिमितीनं ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली होती. मात्र ऋषभच्या सतत अपयशी ठरण्यामुळे धोनीला घेण्याची मागणी होताना दिसली.

Visit : Policenama.com