Video : महेंद्रसिंग धोनीची क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील कामगिरी ; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटच्या इतिहासात महेंद्रसिंग धोनीचे नाव एक यशस्वी खेळाडू म्हणून घेतले जाते. कॅप्टन कुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली वर्ल्डकप जिंकण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली. त्या आधी २००७ च्या टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला. यामुळे एक यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी समोर आला. लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर या खेळाडूने अधिराज्य गाजवणारा धोनी या वर्ल्डकपनंतर निवृत्तीच्या वाटेवर आहे. माही, कॅप्टन कुल, MSD, MS अशा टोपण नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या एकदिवसीय, कसोटी, टी ट्वेंटी कारकिर्दीवर धोनीच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकू या.

Captain who changed the face of Indian cricket

धोनीने भारतीय संघाकडून पहिला एकदिवसीय सामना २००४ साली बांगलादेशविरुद्ध खेळला होता. धोनी पहिल्याच सामन्यात ० धावांवर बाद झाला. मात्र पुढील सामन्यात धोनीने चमकदार खेळ करून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.

एकदिवसीय कामगिरी
एकूण सामने – ३१८,  एकूण धावा – ९९६७,  एकूण चौकार – ७७०,  एकूण सिक्स – २१७,  एकूण शतक – १०,  अर्धशतक – ६७

कसोटीतील कामगिरी
एकूण सामने – ९०,  धावा – ४८७६,  एकूण चौकार – ५४४,  सिक्स – ७८,   शतक – ६,   द्विशतक – १,  अर्धशतक – ३३
MS Dhoni from ‘Wicket-keeper to Wedding keeper’ 

टी ट्वेंटी सामन्यांतील कामगिरी
एकूण सामने – ८९,  धावा – १४४४,  चौकार – १०१,  सिक्स – ४६,  अर्धशतक – २

महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. एकदिवसीय सामन्यांत तो अजूनही देशासाठी खेळत आहे. या वर्ल्डकप सामन्यानंतर धोनी एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका