MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही

0
1103
MSBSHSE Pune | class 10th 12th examination students are not allowed to enter the examination hall after the time
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE Pune) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांसाठी (10th and 12th Exams) आता विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजल्यानंतर परिक्षा कक्षात प्रवेश मिळणार नाही. तसेच परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार (Malpractice) केल्यास विद्यार्थ्याची संपादणूक रद्द करण्यात येवून, पुढील परिक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात येईल. आणि पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल. त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (MSBSHSE Pune)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे (MSBSHSE Pune) बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी
ते १ मार्च २०२३ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे.
या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
तसेच या सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

करोना काळानंतर, राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या होत्या.
त्यात शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र, परीक्षेसाठी पंधरा मिनिटे ते अर्धा तास अतिरिक्त वेळ
आदींचा समावेश होता. मात्र यंदा नियमित पद्धतीने परीक्षा होणार असल्याने या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे अधिक पारदर्शक पध्दतीने परिक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं कंबर कसली आहे.

Web Title :- MSBSHSE Pune | class 10th 12th examination students are not allowed to enter the examination hall after the time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

Nitin Deshmukh | ‘नारायण राणे आणि नितेश राणे यांचा चेहरा पाहिला तर, ते महाराष्ट्रीयन सोडा…;’ आमदार नितीन देशमुख यांची राणे पिता-पुत्रावर टीका