कोल्हापूरामध्ये महावितरणच्या लिपीकाची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन

महावितरण कंपनीच्या सहायक लिपिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज येथे उघडकीस आली. येथील शेंडा पार्क परिसरात पाण्याच्या टाकीवर हा प्रकार घडला आहे. चेतना विकास मंदिर परिसरात दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

राजाराम कुमान्ना जोशीलकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी मृताचे ओळखपत्र मिळाले असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत राजाराम हे मंगळवार पेठ पाटाकडील तालीम परिसरात राहतात. जोशीलकर यांचे एक बंधू पैलवान असून एक पोलिस खात्यात आहे, अशी माहिती मिळाली आहे.