30 हजाराची लाच स्विकारताना MSEB चा सहायक अभियंता अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – वीज चोरी बाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून ती लाच सहकारी कर्मचाऱ्याच्या हस्ते स्विकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) दुपारी सव्वा एकच्या सुमारास ठाणे पश्चिमच्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक अभियंता मोहम्मद जव्वादउल्ला सिद्दिकी (वय.२७, रा. के. व्हीला, तेजदीप बिल्डिंग, फ्लॅट नंबर ४०२, पहिली राबोडी, ठाणे (पश्चिम), तंत्रज्ञ विलास प्रभाकर कांबळे (वय ४६, रा. १/२, लालतासिंग चाळ सुभाषनगर, असल्फा विलेज, पाईपलाईन जवळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या सासूच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक अभियंता सिद्दिकी याने 30 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना तक्रार देणे मान्य नसल्याने त्यांनी सोमवारी (दि.14) ठाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता सिद्दिकी याने लाचेची रक्कम तंत्रज्ञ विलास कांबळे याच्याकडे देण्यास सांगितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महावितरण्याच्या कार्य़ालयात सापळा रचून सिद्दिकी याच्या सांगण्यावरून कांबळे याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, पोलीस हवालदार घेवारी, मदने, घोलप, पाटील, चालक पोलीस हवालदार महाले यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like