MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी महावितरणकडून (MSEDCL) वीज चोरीविरुद्ध (stealing electricity) धडाक्यात मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत 1418 ठिकाणी 1 कोटी 28 लाख रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा महावितरणकडून (MSEDCL) नुकताच पर्दाफाश करण्यात आला आहे. तिनदा घेतलेल्या या एक दिवसीय विशेष मोहिमेत (Special campaign) आतापर्यंत 4983 ठिकाणी 5 कोटी 64 लाख 32 हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वापर (Unauthorized use) उघडकीस आला आहे. वीजचोरी व दंडाची रक्कम न भरणाऱ्या चोरट्यांविरुद्ध विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

आर्थिक संकटात असलेल्या महावितरणने (MSEDCL) वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाईसह गेल्या ऑगस्टपासून पुणे प्रादेशिक विभागात
(Pune Regional Division) एक दिवसीय विशेष मोहीम सुरु केली आहे.
प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे (Ankush Nale) यांनी याबाबत निर्देश दिले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागासह स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या
अनेक पथकांद्वारे वीजचोरीविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
यामध्ये तिसऱ्या एक दिवसीय मोहिमेत शनिवारी (दि.9) सकाळी सुरु झालेल्या कारवाईचे सत्र दिवसभर सुरु होते.
यात पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी 16 हजार 527 वीजजोडण्यांच्या तपासणीमध्ये 1418 ठिकाणी 8 लाख 32 हजार युनिट म्हणजे 1 कोटी 28 लाख 8 हजार
रुपयांच्या विजेचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला आहे.

 

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत वापर

या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात (Pune district) 889 ठिकाणी 81 लाख 19 हजार, सातारा (Satara District) – 203 ठिकाणी 17 लाख 63 हजार, सोलापूर (Solapur District)- 68 ठिकाणी 5 लाख 19 हजार, कोल्हापूर (Kolhapur District)- 79 ठिकाणी 13 लाख 45 हजार आणि सांगली जिल्ह्यात (Sangli District) 179 ठिकाणी 10 लाख 62 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे. आतापर्यंत तिनही एक दिवसीय मोहिमेत पुणे जिल्ह्यात 2535 ठिकाणी 3 कोटी 41 लाख 35 हजार, सातारा- 628 ठिकाणी 45 लाख 16 हजार, सोलापूर- 929 ठिकाणी 90 लाख 3 हजार, कोल्हापूर- 391 ठिकाणी 67 लाख 96 हजार आणि सांगली जिल्ह्यात 500 ठिकाणी 19 लाख 97 हजार असा एकूण 4983 ठिकाणी 5 कोटी 64 लाख 32 हजार रुपयांच्या विजेचा अनिधिकृत वापर उघडकीस आला आहे.

तर कारवाई केली जाईल

महावितरणकडून मागेल त्यांना तात्काळ वीजजोडणी देण्यात येत आहे. त्यासाठी मोबाईल अॅप (Mobile app) किंवा अधिकृत संकेतस्थळावरून नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.
वीज वापरासाठी आकडे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे वीजचोरी करू नये तर अधिकृत वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यासोबतच वीजबिलांच्या थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा वीजपुवरठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्याही वीजजोडण्यांची तपासणी विविध पथकांद्वारे करण्यात येत आहे.
परस्पर वीजपुरवठा सुरु करून घेणे किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचा प्रकार आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे.

 

Web Title : MSEDCL | 5.64 crore power theft exposed in Western Maharashtra, 81 lakh power theft exposed in 889 places in Pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ; जाणून घ्या दर

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या पुढाकारातून काश्मीरच्या बारामुल्लामध्ये डॅगर परिवार स्कूलचे उद्घाटन