ताज्या बातम्यापुणे

‘महावितरणच्या वडगाव उपविभागात 100 कोटींच्या अपहाराचे आरोप तथ्यहिन व खोटा, हा तर MSEDCL व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा हा कुटील प्रकार’ – महावितरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MSEDCL | अधिकार कार्यकर्ते व राष्ट्रनिर्माण दलाचे अध्यक्ष भालचंद्र सावंत (RTI Activist Bhalchandra Sawant) यांनी मंगळवारी (दि.17) पत्रकार परिषद घेऊन महावितरणच्या पर्वती विभागातील वडगाव धायरी उपविभागामध्ये (Wadgaon-Dhayari Subdivision) नवीन वीजजोडणी (New Power Connection) देताना 100 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर आज (बुधवार) महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (MSEDCL PRO) याबाबत खुलासा करुन भालचंद्र सावंत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले (Allegations Denied) आहेत. (MSEDCL)

 

महावितरणने खुलासा करताना म्हटले की, वडगाव उपविभागामध्ये सन 2015 च्या सुमारास महावितरणचे नवीन वीजजोडणी संदर्भात असलेले नियम डावलून काही ठिकाणी लघुदाब (Low Pressure)
घरगुती नवीन वीजजोडण्या देण्यात आल्याबाबतची एक तक्रार 2016 – 17 मध्ये मुख्य अभियंता (Chief Engineer),
पुणे परिमंडल पुणे व नव्याने नुकतेच सुरु झालेल्या प्रादेशिक संचालक कार्यालयास (Regional Director Office) प्राप्त झाली होती.
या तक्रारीनुसार दोन्ही कार्यालयांकडून ताबडतोब चौकशी (Inquiry) करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्याप्रमाणे चौकशी केल्यानंतर वडगाव उपविभागमधील किरकटवाडी (Kirkatwadi) व धायरी शाखा (Dhayari Branch)
कार्यालय अंतर्गत लघुदाब घरगुती वीजजोडण्या देण्यामध्ये संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखविला व नियमांचे पालन केले नाही असे आढळून आले.
त्याप्रमाणे दोन्ही अभियंत्यांविरुद्ध तात्काळ निलंबनाची (Engineer suspended) कारवाई करण्यात आली.
तसेच त्यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध दोषारोप पत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले.
त्यावर सुनावणी होऊन संबंधितांना कंपनीच्या नियमाप्रमाणे शिक्षा देखील झाली आहे. (MSEDCL)

विशेष म्हणजे या प्रकरणाची सहा वर्षांपूर्वी चौकशी व संबंधितांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
तसेच घरगुती वीजजोडणी (Household Electrical Connection)
देण्याचा प्रकार देखील प्रादेशिक संचालक कार्यालय स्थापन होण्यापूर्वीचे आहे.
परंतु सहा वर्षांनंतर आता या प्रकरणात 100 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा जो आरोप होत आहे तो अत्यंत तथ्यहिन व खोटा आहे.
यासोबतच सावंत यांनी महावितरण व वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात केलेले इतर आरोप देखील अत्यंत बिनबुडाचे व तथ्यहिन आहेत.
मात्र असे खोटारडे आरोप करून महावितरण व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा हा कुटील प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title :- MSEDCL | Allegations of embezzlement of Rs 100 crore in MSEDCLs Wadgaon sub division are unfounded and false this is a cunning way to defame MSEDCL and senior officials

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button