२ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी अकोला येथील दुर्गा चौकात असलेल्या कार्यालयात करण्यात आली. मोरेश्वर शिरसे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.

शिरसे याने तक्रारदारास सौर ऊर्जा प्रकल्पाच्या निर्मीतीसाठी योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी, तसेच विजचोरांची माहिती महावितरण कंपनीला दिल्यानंतर त्यामधील १० टक्के बक्षिसाची रक्कम देण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीमध्ये २२ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सुरुवातीला दोन हजार रुपये देण्यासाठी शहर विभागाच्या दुर्गा चौकातील कार्य़ालयात भेटण्याचे शिरेस आणि तक्रारदार यांचे ठरले होते.

दरम्यान, याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता २२ हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच टोकन म्हणून दोन हजार रुपये स्विकारण्याचे ठरले होते. पथकाने शहर विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. शिरसे याला दोन हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पडकडून लाचेची रक्कम जप्त केली.

ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील राऊत, पोलीस शिपाई राहुल इंगळे, सुनील येलोने, नीलेश शेगोकार, चालक कैलास खडसे यांच्या पथकाने केली.

शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर पोलीसांकडून तडीपारीचा प्रस्ताव
मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाची काढली धिंड