सीरियावरील बॉम्ब हल्लयाची बातमी सांगत होती अँकर, LIVE TV वर समोर आला तिचा मुलगा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंथा – सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ जोरदार पद्दतीने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक अँकर न्यूज सांगताना दिसत आहे आणि अचानक तिचा लहान मुलगा मध्ये येत आहे. नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे.

अमेरिकेन न्यूज चॅनल ‘MSNBC’ च्या न्यूज अँकर कर्टनी क्यूब जेव्हा गुरुवारी तुर्कीकडून सीरियावर टाकण्यात आलेल्या बॉम्ब संधर्बातील बातमीचे वार्तांकन करत होती त्यावेळी अचानक त्यांचा लहान मुलगा स्क्रीन समोर आला. तेव्हा लगेच अँकर बोलली की माझा मुलगा इथे आहे, लाईव्ह टीव्ही वरती.

याबाबतचा व्हिडीओ त्या न्यूज चॅनलने स्वतः आपल्या ट्विटरवरून पोस्ट केला आहे. तीस लाखांहून अधिक लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे. मोठ्या प्रमाणावर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

चॅनल ने आपल्या ट्विटवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ब्रेकिंग न्यूज सांगताना अशा प्रकारे देखील ब्रेकिंग न्यूज होऊ शकते याबाबत तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे आणि लोक अँकरची चांगलीच फिरकी घेत आहे.

या आधी देखील झाले आहे असेच काही

या आधी देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, 2017 मध्ये प्रोफेसर रॉबर्ट केली बीबीसी वरती लाईव्ह मुलाखत देत होते तेव्हा त्यांची मुलगी अचानक समोर आली होती त्यावेळी प्रोफेसर नॉर्थ कोरियाच्या मुद्द्यावर बोलत होते.

अमेरिकेच्या सैन्याच्या नॉर्थ सीरियातील माघारी नंतर तुर्कीकडून जोरदार हल्ला सुरु आहे, अमेरिका भारतासमवेत अनेक देशांनी तुर्कीच्या या हल्ल्याची निंदा केली आहे.

 

visit : Policenama.com