पर्यटकांसाठी खुशखबर ! ‘न्यू महाबळेश्‍वर’ अस्तित्वात येणार, 3 तालुक्यातील 52 गावांचा समावेश, जाणून घ्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – महाबळेश्‍वरच्या पर्यटनवाढीसाठी आणखी चालना देण्यासाठी ‘न्यू महाबळेश्‍वर’ प्रकल्प वसविण्यात येणार आहे. जागतिक वारसास्थळ असणाऱ्या काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील 52 गावांचा या प्रकल्पाअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने यासंदर्भातील अध्यादेश नुकताच जारी केला आहे.

असा असेल प्रकल्पाचा आराखडा –

न्यू महाबळेश्‍वर प्रकलपाअंतर्गत तीन तालुक्यातील तब्बल 37 हजार 258 हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सातारा येथे नवीन कार्यालय सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. हे शहर वसविताना पर्यावरणाला बाधा येऊ नये, यासाठी सात अटींवर महामंडळाला हे शहर वसविण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या गुंतवणुकीसोबतच त्यासाठी आवश्‍यक त्या सेवा-सुविधांची उपलब्धता ही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

2004 साली मंजूर झालेला हा प्रकल्प अनेक दिवस रखडला होता आता पुन्हा नव्याने याची अधिसूचना काढली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे.

visit : policenama.com