
MSRTC Electric Buses | आता लवकरच धावणार इलेक्ट्रिक एसटी ! पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि महाबळेश्वरचा प्रवास होणार ‘सुखद’
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – MSRTC Electric Buses | वाहन घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरच्या वाहनांची संख्या वाढत आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याचं दिसत आहे. तसेच, सध्याचं वाढतं प्रदूषण या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पुढाकाराने अनेक राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जातेय. यावरून महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जातेय. अशातच आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC Electric Buses) देखील पुढाकार घेतला आहे. आता एसटी देखील लवकरच इलेक्ट्रिक बस वापरणार आहे. येत्या काळामध्ये राज्यात इलेक्ट्रिक एसटी (ST) दिसणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
आता एसटी प्रशासन 100 इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली झाली आहे. लवकरच याबाबत अध्यादेश काढला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, भाडेतत्वावर घेणाऱ्या 100 पैकी 30 बसेस पुणे विभागात येणार आहेत. या बसेसची आसनक्षमता 43 असणार आहे. आगामी ६ महिन्यामध्ये पुणे स्टँडवरून राज्यातील 5 शहरांसाठी इलेक्ट्रिक एसटी धावणार आहे. यात 1- पुणे-औरंगाबाद, 2- पुणे-नाशिक, 3- पुणे-कोल्हापूर, 4- पुणे-सोलापूर, 5- पुणे-महाबळेश्वर या 5 शहरांसाठी पुण्याहून इलेक्ट्रिक बसेस धावणार आहे.
Chand Nawab | पाकिस्तानी पत्रकार चांद नवाबचे व्हायरल व्हिडिओचा होणार लिलाव
राज्यातील 7 ठिकाणी चार्जिंग व्यवस्था –
एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग करून देण्याची जबाबदारी महामंडळाची असणार आहे. त्यासाठी राज्यात 7 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभं केलं जाणार आहे. यात
पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर या शहरांचा समावेश असणार आहे.
पुण्यात तब्बल 3000 किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन…
पुण्यात तब्बल 3000 किलोवॅट क्षमतेचं चार्जिंग स्टेशन उभं केलं जाणार आहे. यासाठी अंदाजे खर्च दोन कोटी रुपये लागेल. सेव्हन लव्ह चौक इथल्या विभाग नियंत्रक कार्यालयानजीक हे स्टेशन उभारलं जाईल. पुण्यात चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या तांत्रिक परवानग्या मिळाल्या आहेत. निधीची उपलब्धता झाल्यानंतर काही 3 महिन्यामध्ये हे स्टेशन उभं केलं जाणार आहे. यात 20 चार्जिंग पॉईंट्स असतील. यामध्ये 150 किलोवॉटसाठी 10 चार्जर तर 90 किलोवॉटसाठी 10 चार्जरचा वापर केला जाईल. 1 बस चार्ज होण्यासाठी 2 तासांचा वेळ लागेल. एकदा चार्ज झाल्यानंतर बस साधारण 300 किमी धावू शकते.
चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांना करात सवलत मिळणार –
सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. याबाबत राज्य
सरकारने ई-वाहनांसाठी धोरण (E Vehicle Policy) जाहीर केलं आहे. यामध्ये अनेक सवलती
देण्यात आल्यात. तसेच, शहरं आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन (Charging
Station) उभारण्याचा संकल्प केला आहे. या अनुषंगाने चार्जिंग स्टेशनची निर्मिती करणाऱ्यांना करात सवलत देखील दिली जाणार आहे.
Bollywood Actress | ‘या अभिनेत्रीचा सवाल; म्हणाली – ‘मुलीने कंडोम विकत घेतल्यास त्यात वाईट काय?’
Pune Crime | स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर FIR