MSRTC Employees Strike | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप मागे, परिवहन मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन MSRTC Employees Strike | विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आज गुरूवारी 28 ऑक्टोबर रोजी दिवसभर बंद पुकारला होता. या बंदमुळे एसटी बसेसची वाहतुक ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान कर्मचार्‍यांची महागाई भत्त्याची मागणी पूर्ण केल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले आहे. कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 12 टक्केवरून 28 टक्के केला आहे. यानंतर कर्मचारी संघटनेने बंद (MSRTC Employees Strike) मागे घेतला. एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे आज प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक ठप्प झाली होती. आजच्या बंदची माहिती नसल्याने अनेक प्रवाशी बाहेर पडले होते, त्यांना बंदमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

पुणे शहरातील स्वारगेट आगारात रोज सुमारे 1400 एसटी बसेस ये-जा करतात. मात्र, संपाच्या पार्श्वभूमीवर आज एकही गाडी डेपोतून बाहेर पडली नाही.
दिवाळीसाठी प्रवाशांची वर्दळ असून अचानक बंदला (MSRTC Employees Strike) सामोरे जावे लागल्याने असंख्य प्रवाशांचे हाल झाले.

 

एसटी कर्मचार्‍यांनी इतर राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, शिवाय इतर भत्ते लागू करावेत, इत्यादी मागण्या केल्या होत्या.
यापैकी महागाई भत्ता 12 टक्केवरून 28 टक्के केल्याचे आज परिवहन मंत्री परब यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, राज्यात दोनच दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने 17 टक्के भाडेवाढ केली आहे.
यामुळे ऐन दिवाळी सणात एसटी प्रवाशांच्या खिशावर भार येणार आहे.

 

Web Title : MSRTC Employees Strike | indefinite strike st workers was called parivahan anil parab

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ (व्हिडीओ)

Supreme Court | लवकरच लागणार NEET चा निकाल; उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला रद्द

Gold Price Today | 2 दिवसानंतर सोने पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे नवीन दर