दुष्काळात तेरावा महिना… लालपरीचा प्रवास दिवाळीत महागणार 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन 
नवरात्र आणि दसरा संपल्यानंतर साऱ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी मूळ गावी साजरा करण्याकडे अनेकांचा कल असतो. यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षणीय वाढते. या काळात राज्यात एसटी बसचा प्रवास प्रवाशांना महाग पडणार आहे. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ लागू असेल. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीतच सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एक समान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adc62939-cbc9-11e8-9c32-f7447b0e99e0′]
एस. टी. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्के पर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. यंदा यानुसारच दरवर्षीप्रमाणे सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारासाठी केवळ २० दिवसासाठी सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली असून सदर भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
 [amazon_link asins=’B07G5BTYC2,B01D2IBFXM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fc54cca-cbca-11e8-b22b-a9afc50b7c1e’]
खासगी वाहतूकदार या काळात अव्वाच्या सव्वा दर वाढवून प्रवाशांची लूटमार करतात. मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळही जादा बसगाड्या उपलब्ध करून तात्पुरत्या स्वरूपात दरवाढ करत आहे. या वर्षीच्या दिवाळीत ही परंपरा कायम राहणार आहे. एसटी महामंडळाने यात्रा, सणासुदीचा काळ, दिवाळी सुटी तसेच सप्ताहअखेर होणारी गर्दी लक्षात घेत भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. त्याची झळ प्रवाशांना सहन करावी लागणार आहे.
[amazon_link asins=’B06XFLY878,B07BHVY55G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b02c374d-cbca-11e8-873b-e9783a1d934a’]