आता एसटीचा प्रवास ‘कॅशलेस’ करता येणार ; स्मार्ट कार्ड ‘लाँच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता एसटीचा प्रवास कॅशलेस करता येणार आहे. त्यासाठी स्मार्ट कार्डही लाँच करण्यात आले आहे. मुंबई लोकलच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल. स्मार्ट कार्डची किंमत ५० रुपये असेल. विशेष म्हणजे हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती किंवा मित्र एसटीच्या प्रवासावेळी हे कार्ड स्वाइप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.

काल शनिवारी एसटीचा ७१ वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्त ही योजना सुरु करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते स्मार्टकार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

योजनेचे स्वरूप –

मुंबई लोकलच्या एटीव्हीएम या कॅशलेस प्रणालीच्या धर्तीवर एसटीचे हे स्मार्ट कार्ड असेल. स्मार्ट कार्डची किंमत ५० रुपये असेल. सुरुवातीला त्यामध्ये ३०० रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत ५ हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल.

स्मार्ट कार्ड योजनेचे फायदे –

हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती किंवा मित्र एसटीच्या प्रवासावेळी हे कार्ड स्वाइप करुन प्रवास करु शकतील. एसटी प्रवासाशिवाय शॉपींगसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे.