MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. त्यात चालक आणि वाहक यांचा समावेश आहे. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने चालक व वाहकाला कामावर बोलावल्यानंतर कोणत्याही कारणाने त्याची गैरहजेरी न लावता, त्या दिवसाचा त्याचा पगार देण्यात यावा, अशी मागणी केली होती. यावर महामंडळाकडून MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

यामुळे येथून पुढे कोणत्ही एसटी (ST) कर्मचाऱ्याला कामावार बोलाविल्यानंतर त्याचा त्या दिवसाचा पगार सुरु राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती राज्यातील विभाग नियंत्रण महाव्यवस्थापक अजित गायकवाड (Ajit Gaikwad) यांनी दिली. विभाग नियंत्रकांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आगारात चालविण्यात येणाऱ्या समय वेतनश्रेणी तसेच रोजंदारी गट 1 व 2 चालक आणि वाहक यांचा वापर करावा. त्यानुसार त्यांना गाड्या उपल्बध करुन द्याव्यात. त्यामुळे त्यांना कामाअभावी रिकामे बसता येऊ नये. पूर्वी गाड्या नसल्यास कर्मचारी रिकामे बसत होते. त्यामुळे त्यांचा त्या दिवसाचा पगार मिळत नव्हता. त्यामुळे संघटनांनी ही मागणी केली होती. आता सर्वांना कामावर आल्या दिवसाचा पगार मिळणार आहे. त्यांना काम देणे वरिष्ठांची जबाबदारी राहणार आहे.

मोटर वाहतूक अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार, कोणताही कर्मचारी 12 तास आगारात हजर राहिल्यास त्याला काम देता आले नाही, तर त्या दिवशी रजेचा अर्ज घेऊ नये.
त्या दिवशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमाप्रमाणे नोंदवून त्याला पगार देण्यात यावा.
तसेच कोणत्याही कारणामुळे कर्मचाऱ्याला कामगिरी देता आली नाही,
तर याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, असे आदेश महामंडळाने काढले आहेत.

 

Web Title :- MSRTC | st employees good news corporations take major decisions regarding leave and salary msrtc news today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Threat Letter To Rahul Gandhi | राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी ! मिठाईच्या दुकानात मिळालं लेटर; ‘तुम्हाला बॉम्बने…’

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा मेसेज करुन 10 लाखांच्या खंडणीची मागणी, चाकण परिसरातील घटना

Rishi Sunak | ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऋषी सुनक यांचे मोठे निर्णय