MSRTC | एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन–  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ (Dearness Allowance Hike) करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब (State transport minister Anil Parab) यांनी केली आहे. या निर्णयाचा फायदा 93 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. तसेच 7 तारखेला जमा होणारा पगार यंदा दिवाळीपूर्वी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी जमा होणार आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या MSRTC कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. त्यामध्ये आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याचे परब यांनी सांगितले.
एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
यांचे परब यांनी आभार मानले.

 

तिकीट दरात 17 टक्के भाडेवाढ

 

मागील काही दिवसांत सातत्याने पेट्रोल (petrol), डिझेल (diesel) आणि गॅसच्या (gas) किमती वाढत आहेत.
त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला असताना त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे.
एसटी महामंडळाने (MSRTC) राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दर वाढवण्याचा (Ticket price increase) निर्णय घेतला आहे.
एसटी प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे मोजावे लागत होते, आता 1 रुपया 45 पैसे मोजावे लागणार आहे.
तिकीट दरात 17.17 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title : MSRTC | st mahamandal msrtc staff to get diwali gift 5 da hike early pay

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Life Certificate | Pensioners Alert ! थांबू शकते तुमची पेन्शन, जर लवकरात लवकर केले नाही ‘हे’ काम

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 82 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | अर्थ मंत्रालयाने सरकारी कर्मचार्‍यांसाठी 31 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून केला लागू