Uncategorized

MSRTC Workers Strike | एसटी महामंडळाचं विलीनीकरण झालंय का? परिवहन मंत्री अनिल परबांचं सूचक वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइम टीम – MSRTC Workers Strike | एसटी कामगारांनी गेल्या तीन महिन्यापासून आपला लढा सुरू ठेवला आहे. त्यांची प्रमुख मागणी म्हणजे एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिगीकरण (Separation) करण्यात यावं. यावर आज सुनावणी होती यामध्ये मात्र एसटी (MSRTC Workers Strike) संपाची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे.

 

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भातील अहवाल कोर्टात (Court) सादर करण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय असल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र या अहवालावर मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सही नसल्याने हा अभिप्राय त्यांचाच आहे हे मानायचं कसं?, याबाबतचा काहीतरी पुरावा न्यायालयासमोर येणं गरजेचं असल्याचं मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण आहे. त्यामुळे पुढच्या शुक्रवारपर्यंतच्या सुनावणीची वाट सर्वांना पाहावी लागणार आहे.

 

आजच्या सुनावणीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) अहवालाची प्रत कामगारांना देण्यात येणार आहे. ही प्रत कर्मचाऱ्यांना दिली आहे त्यामुळे त्यांना ती वाचण्याचा वेळ दिला आहे तोपर्यंत पुढच्या सुनावणीची तारीख दिली असल्याचं अनिल परब म्हणाले. (MSRTC Workers Strike)

 

दरम्यान, संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून (Salary) वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नसल्याचं परब यांनी सांगितलं.

 

Web Title :- MSRTC Workers Strike | is MSRTC merged anil parab gave a suggestive response on mumbai high court order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button